04 February, 2020

जिवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपले व्यक्तीमत्व चांगले असले पाहिजे

जिवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपले व्यक्तीमत्व चांगले असले पाहिजे

            1)   व्यक्तीमत्व म्हणजे काय ? तर आपल्या मधील यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने आपली मानसिक्ता बदलायला हवी आणि आपल्या मध्ये काय दडलेले आहे ते ओळखायला हवे ते तुम्ही ओळखू शकला तर अशी कोणतीही गोष्ट नाही की ती तुम्ही मिळवू शकत नाही.


            2)   थोडक्यात सांगायचे झाल्यास व्यक्तीमत्व म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये मानसिेक गुण म्हणजे आत्मविश्वास,प्रामाणिकपणा,हावभाव,बोलणे,व्यावहारिक ज्ञान,दुस-याबद्दल्ल भावना,स्वत:बद्दलचा आत्मविश्वास या सर्व गोष्टी मधून व्यक्त होतात.

            पण ब-याच व्यक्तीमध्ये हे गुण नसतात ते स्वत: भितीने आणि शंका कुशकांनी जडलेले असतात.त्यांना स्वत:ला असे वाटते की जर मी माझ्या जिवनात अयशस्वी झालेा तर मग?माझे आर्थिक नुकसान होईल व लोक माझ्यावर हसतील अशी व्यक्ती कधीही जिवनामध्ये पुढे जाऊ शकत नाही.

            पण आजकालच्या धकाधकीच्या जिवनामध्ये माणसाला अनेक प्रकारचे शारिरीक आजार जडत आहेत जसे की मानसिेक व शारिरीक ताण वाढत आहे,त्यामुळे मधुमेह,रक्तदाब,हद्यविकार असे आजार उद्भवत आहेत.

           परंतु या सर्व गोष्टी मधुन आपल्या यशाकडे वाटचाल करुन आपले व्यक्तीमत्व घडवणे आपले कर्तव्यच बनले आहे,


HOW TO ACHIEVE SUCCESS IN OUR LIFE

HOW TO ACHIEVE SUCCESS IN OUR LIFE

 WHO AM I ? WHAT CAN I DO ?

मी कोण आहे ? मी काय करु शकतो ? जेव्हा आपण आपल्या स्वत:ला असे प्रश्न केले तर आपले व्यक्तीमत्व काय आहे हे आपल्याला कळून येईल,व त्यासाठी आपल्याला काय पाहिजे ? कशासाठी पाहिजे ? असे प्रश्न पडतील.


आपले शरीराचे आरोग्य,सामर्थ्य आणि प्रतिकार क्षमता व राहनीमान यापासून आपले शारीरीक व्यक्तीमत्व दिसून येते.आणि प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक सुतुलन,दृष्टीकोन,चंचलपणा,भावनिक ज्ञान,बुध्दीमत्ता याने प्रभावित करते,विचार करण्याची पध्दत,विचार क्षमता,निर्णय घेण्याची क्षमता हे व्यक्तीमत्व आपल्या कार्यावर अवलंबून असते.तसेच सामाजिक कार्य व्यवहारिक कौशल्य दृष्टीकोन व आर्थिक स्वातंञ्य आाणि संपत्ती विषयी दयाळूपणा आपल्यात असणे करजे आहे.
 



काहीतरी उत्तुंग करण्याची

जिद्द बाळगावी,

विचारांवर विश्वास ठेवावा……

आणि आपल्या

कतृत्वाने ते साध्य करावे.

1)  यशस्वी होण्यासाठी आपल्या स्वत:मध्ये काय बदल करावे


प्रत्येक व्यक्ती आपल्याला यश मिळावे म्हणुन प्रयत्न करत असतो.परंतु प्रयत्न करुन सुध्दा अपयशच येते.यामागील कारण म्हणजे आपल्यामधील असलेले व्यक्तीमत्व विकासाची कमी होय अपयशामागील व्यक्तिमत्वाचा हात असतो.पण आपली इच्छा असेल तर आपण आपल्यामधील वाईट गोष्टी कडे दुर्लक्ष करुन आपले व्यक्तीमत्व सुधारु शकतो.व आपल्यात बदल घडवून आणू शकतो.



आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रथम आपल्याला आपले ध्येय ठरवले पाहिजे.मी हेच केले पाहिजे व मला करायचेच याच्यावर आपले ठाम मत पाहिजे व आपण प्रयत्नही केले पाहिजे.त्यामूळे आपला आत्मविश्‌वास वाढेल व आपण आपल्या ध्येयापर्यत्न पोहचू.


       आपले मिञ,आपण्‍ ज्या ठिकाणी राहतो तेथील वातावरण नेहमी सकारात्मक असलायला पाहिजे व आपण नेहमी MOTIVATIONAL VIDIOS,MOTIVATIONAL STORIES,ऐकायला पाहिजे व वाचल्या पाहिजे त्यामूळे आपल्या मध्ये एक उर्जा निर्माण होऊन आपले ध्येय गाठण्यात मदत मिळते.


       आपल्या आयुष्यात ब-याच अशा महत्वाच्या गोष्टी असतात त्यावर आपले लक्ष केद्रित केले पाहिजे.


1)   शरीर :- आपले व्यक्तिमत्व चांगले राहण्यासाठी आपले शरीर उंच,मजबुत आणि सुदृढ असायला पाहिजे आपले शरीर मजबुत असल्यास आपले अंत:मन सुध्दा बळकट होण्यास मदत होते.


2)   आपल्यामध्ये असलेले गुण :- ब-याच व्यक्तिमध्ये स्वत:बद्दल मी पणा दिसुन येतो पण हा मी पणा म्हणजे हा आपल्यातला दुर्गण आहे.आपण म्हणतो ना कि माझ्यामुळे त्याचे भले झाले,माझ्यामूळे त्याचे चांगले झाले,माझ्यामूळेच तो फार मोठा माणूस झाला.मिच सर्व काही करतो हेच आपल्यातले दुर्गुण असतात.आणि यामूळे आपला आत्मविश्वास कमी होतो.या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करुन आपल्या चांगल्या गुणांकडे बघितले पाहिजे व आपले गुण व अवगुण मान्य केले पाहिजे आपण आपल्या मधील असलेले दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


3)   दुस-या व्यक्तिला सारखे सारखे नाव ठेवणे व प्रत्येकाशी तुलना करणे या मुळे आपल्या मधील विश्वास कमी होण्यास कारणीभूत असते.


HOW TO ACHIEVE SUCCESS IN OUR LIFE ? आपल्या जिवनात यश कसे मिळवायचे ?


जिवणामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या आतिल बसलेल्या आपल्या मनाचा सर्वात मोठा वाटा आहे.

मिञांनो आपल्या पूर्ण शरीरावर आपल्या मनाचा ताबा असतो.



आपले मन हे आपल्या शरीराचा राजा असतो आपले मन हे कशावर विश्वास ठेवतो व काय स्वीकार करतो याच्यासाठी आपले शरीर आपल्या मनावर अवलंबुन असते.



आपले ध्येय हे निश्चित असेल तर आपल्या ध्येयाचा आपल्या मनामध्ये पूर्ण सत्यात उतरवले पाहिजे तेव्हा आपले यश हे पूर्ण पणे आपलेच आहे.


जेव्हा आपण आपल्या मनाचा एखादे आदेश देतो की मी काय करतो? कशासाठी करतो?कोणासाठी करतो? या पासून मला काय फायदा आहे? मला काय बनायचे आहे? हे विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपले मन आपल्याला तेच उत्तर देणार कि जे आपल्याला पाहिजे तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो व आपल्याला अभ्यास करण्याचा किंवा एखादया चांगले कार्य करण्याचे ध्येय वाढते.


 

HOW TO ACHIEVE SUCCESS IN OUR LIFE ? आपल्या जिवनात यश कसे मिळवायचे ?

 


आपल्यातील असलेले गुण :-


1)   चांगले विचार केल्याने चांगलेच होत असते वाईट विचार केल्यास वाईटच होते ज्या प्रमाणे आपण विचार करतो त्याच प्रमाणे आयुष्यात घडत असते.


2)   आपल्याजवळ प्रत्येक गोष्ट निवड करण्याची शक्ती असते जे आपण मनापासून निवडाल तेच होईल.


3)   आपल्या बोलण्यावर नेहमी आपले लक्ष असले पाहिजे आपले शब्द हे अस्ञ असते आपल्या एका शब्दाने दुस-याचे मन दुखणार नाही याच्याकडे आपले लक्ष असायला पाहिजे.


4)   आपण जर नकारार्थी विचार केले तर आपण कधीच काही करु शकत नाही त्यासाठी आपले  विचार हे नेहमी होकारार्थी असायला पाहिजे.


5)   इतरांचे बोल तुमचे नुकसान करतील त्यावर मात करण्याचे सामर्थ्य तुमच्या शक्तिवर अवलंबून असते तुमचे विचार बळकट असतील तर कोणीही तुमचे विचार बदलवू शकत नाही.


6)   मी आयुष्यात काहीच करु शकत नाही असे विचार कधीही मनात आणू नये.


7)   मी सर्व काही मिळवू शकतो असे विचार मनात असायला पाहिजे.


8)   आपण काय करु शकतो हे ओळखण्याची क्षमता आपल्यातच आहे हे ओळखाता आले पाहिजे आपले सामर्थ्य जाणून घेतले पाहिजे.


9)   या जगात कष्ट केल्याशिवाय काहिच मिळत नाही,हे आपल्याला माहित आहे परंतु प्रत्यक्षात आमलात आणता येत नाही.कष्ट करुन घाम गाळल्याशिवाय  काहीच मिळत नसते,कष्ट करुनच आपल्याला ध्येयाची उंच शिखरे गाठता येतात व प्रगती होते.


ना थके कभी पैर
ना कभी हिम्मत हारी है
जज्बा है परिवर्तन का जिंदगी में
इसलिये सफर जारी है
मन सभी के पास होता है
मगर “मनोबल”
कुछ लोगों के पास ही होता है

HOW TO ACHIEVE SUCCESS IN OUR LIFE ? आपल्या जिवनात यश कसे मिळवायचे ?




No comments:

Post a Comment

यश मिळवण्याचा हा आहे एकमाञ पर्याय

यश मिळवण्याचा हा आहे एकमाञ पर्याय जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपला आत्मसम्मान कायम ठेवून आपल्यात जडलेल्या सवयींचा गुलाम न होता इत...